मुंबई,दि.२२( punetoday9news):- राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा तसेच राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा वेळेतच होणार असल्याची माहिती NTA ने दिली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने वेबसाईटवर ही माहिती दिली असून जेईई मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे म्हटले आहे. तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अधिकारात नसल्याचे निदर्शनास आले असून कोरोना काळातही आयुष्य थांबायला नको असे वाटते. उमेदवारांचे वर्ष वाया जाऊ नये तसेच त्यांचे भवितव्य अधांतरी जाऊ नये यासाठी सुरक्षेची सर्व काळजी घेऊन परीक्षा घेतली जाईल. पुनर्विचार याचिका योग्य नाही. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेदेखील सदरील परीक्षा पुढे ढकलण्यास नकार देत परीक्षा वेळेतच घेण्याचा निर्णय दिला होता.
Comments are closed