मुंबई,दि.२३( punetoday9news):- पाकिस्तानने नेहमीच दाऊद त्यांच्या देशात असल्याचे नाकारले. मात्र, आता पाकिस्तानने दाऊद कराचीमध्ये असल्याचं कबुल केले आहे. यात २६/११ मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद, जैश ए मोहम्मद प्रमुख मसूद अझर आणि मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स (FATF) या संघटनेने जून २०१८ मध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकत २०१९ संपेपर्यंत दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची दिलेली तारीख कोरोनामुळे पुढे वाढवण्यात आली होती.
आता पाकिस्तानने ८८ संघटनांवर बंदी आणत आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. तसेच त्यांची बँक खाती गोठवण्यात येणार आहेत.
यात दाऊदचा समावेश असून त्याचा पत्ताही जाहिर करण्यात आला आहे. तो दाऊद इब्राहिम ‘व्हाईट हॉऊस, सौदी मशिद जवळ, क्लिफ्टोन, कराची’ येथे वास्तव्यास आहे. याशिवाय ‘हाऊस नं. ३७- ३० स्ट्रीट- डिफेन्स, हॉऊसिंग सोसायटी, कराची’ आणि ‘नुराबाद येथील टेकडीवरील पॅलाटीयल बिल्डिंग’ येथे दाऊदची मालमत्ता आहे.
दाऊद इब्राहीम पाकिस्तानमध्ये मुक्तपणे राहत असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय संस्थेला (यूनो) वेळोवेळी दिले होते. मात्र, पाकिस्तान कडून जाणीवपूर्वक गेल्या ३ दशकांपासून दाऊद कराचीत असल्याचे मान्य केले जात नव्हते.
Comments are closed