मुंबई, दि.२४(punetoday9news):- वाहनांचा अपघात झाल्यास आता विम्याचा दावा करण्यासाठी वाहन प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी अनिवार्य असणार आहे. त्यामुळे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर 20 ऑगस्टपासून विमा कंपन्यानी विमा पॉलिसीचे नुतनीकरण करु नये, असे आदेश भारतीय विमा प्राधिकरणाने (आयआरडीए) विमा कंपन्यांना दिले आहेत.
“विम्याच्या नुतनीकरणासाठी वाहन मालकाकडे पीयुसी (PUC) असणे गरजेचे आहे. वाहनांचा विमा काढण्यासाठी यापुढे हे प्रमाणपत्र ग्राहकांना विमा कंपन्यांना द्यावं लागेल.” तसेच कंपन्या आणि ग्राहकांना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं कसोशीनं पालन करण्यास सांगण्यात आले आहे . सुप्रीम कोर्टाने विमा कंपन्यांना आदेश दिले होते की, त्यांनी संबंधित वाहनाची पीयूसी तपासल्याशिवाय विम्याचे नुतनीकरण करु नये.
त्यामुळे पीयूसीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास १०हजार रु. दंड लावला जात आहे. प्रदुषण रोखण्यासाठी प्रत्येक वाहनाला त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकांनुसार तपासले जात आहे .
Advertise:-
Comments are closed