पिंपरी,दि.२४(punetoday9news):- पिंपरी चिंचवड मध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने तसेच दगडी पाटा डोक्यात घातल्याने तरूण गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार (दि. २२) पहाटे १२.१५ वा. विद्यानगर, चिंचवड येथील हनुमान मंदिरासमोर घडली.
शंकर गोविंद सुतार (वय २३, रा. हनुमान मंदिरासमोर, विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष चौगुले (वय २५), अजय कांबळे (वय २३), मोसीन शेख (वय २५), पप्पू पवार (वय २८) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी नीला गोविंद सुतार (वय ४५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शंकर सुतार व आरोपी यांच्यात विरोधी गटातील तरुणाच्या फोटोचा व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणावरून आरोपींची पुन्हा मृताच्या भावसह इतरही
तरुणांशी बाचाबाची झाली होती. त्याचा राग आरोपी यांच्या मनात होता. शंकर सुतार हा रात्री हनुमान मंदिरासमोर झोपला. रात्री १२.१५च्या सुमारास आरोपी तेथे आले. त्यांनी झोपेत असलेल्या शंकर याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच दगडी पाटा डोक्यात मारला. यात शंकर गंभीर जखमी झाला. त्याला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
Comments are closed