कार्यकर्त्यांच्या मते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी.
दिल्ली,दि.२४(punetoday9news):- काँग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत पक्षाचे अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सभासदांना अध्यक्षपदावरील जबाबदारीपासून मुक्त करून पक्षाला संकटातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. तत्पूर्वी पक्षाच्या मुख्यालयाबाहेर असलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि गांधी कुटुंबियांपैकीच अध्यक्ष बनविण्याची मागणी केली.
कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. मनमोहनसिंग, प्रियांका गांधी, कॅप्टन अमरिंदर सिंग इत्यादी नेते या ऑनलाईन बैठकीत उपस्थित आहेत.
कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पक्षाच्या नेत्यांनी लिहिलेल्या पत्राची वेळ चुकीची असल्याचे म्हटले. त्याचवेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, या पत्रामुळे मी दुखावलो गेलो आहे.
कार्यकारी समितीच्या बैठकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांना अध्यक्षपदावर कायम राहण्याचे आवाहन केले. ए के अँटनी म्हणाले की, हाय कमांड कमकुवत करणे म्हणजे पक्ष कमकुवत करणे. एखादा सहकारी असे पत्र कसे लिहू शकेल?
Comments are closed