दिल्ली,दि.२४(punetoday9news):- काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पक्षातील पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहिले आहे त्यामुळे पक्षात मोठा गदारोळ चालू आहे या धर्तीवर आज काँग्रेस ने मीटिंग घेऊन चर्चा केली . मात्र या वादात ओवेसीनी उडी घेत नवी चर्चा सुरु करून देण्याचीच चर्चा होऊ लागली आहे .
पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या निवडीबरोबरच सर्वच पातळ्यांवर फेरबदल करण्याची मागणी काही नेत्यांनी केली होती. या पत्रामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चेवरून आंतरिक घमासान सुरू झाल्याचे चित्र असून, काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीतही ते दिसून आले . या पत्रावरून राहुल गांधी यांनी पत्र लिहिणार्यांनाच फटकारत हे भाजपा पूरक असल्याचा आरोप केला.
त्यावरून गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. याच मुद्द्यावर निशाणा साधत एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे.

त्यांनी ट्विटर च्या माध्यमातून असे ट्विट केले आहे कि , “काव्यात्मक न्याय! गुलाम नबी आझाद तुम्ही माझ्यावर असाच आरोप केला होता. आता तुमच्यावरही असाच आरोप झाला आहे. याचसाठी ४५ वर्षे गुलामी केली का? आता हे सिद्ध झालं आहे की, जे कुणी जानवेधारी नेतृत्वाला विरोध करतात त्यांना बी टीम ठरवलं जाईल. आता मला आशा आहे की, मुस्लिमांना काँग्रेसप्रती असलेल्या निष्ठेची किंमत कळेल?,” अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.

 

 

 


Comments are closed

error: Content is protected !!