पुणे दि. २४(punetoday9news):- म. रा. मा. वि.वि.महामंडळाच्या सन २०२० व २१ या वर्ष करिता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्हयासाठी ८३ भौतिक व आर्थिक ९४.६२ लाख तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी भौतिक १५ व आर्थिक ८६.२५ लाख उद्ष्टिये प्राप्त झाले असल्याचे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी सांगितले आहे.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रु. १० लाख पर्यंत वैयक्तिक कर्ज परतावा तसेच रु. १० ते ५० लाखापर्यत समकक्ष गटकर्ज व्याज परतावा योजना आहे. या दोन्ही योजना बँक मार्फत राबविली जाईल. कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रामाणिकरणानुसार (जास्तीत जास्त १२% पर्यत) महामंडळाकडून केला जाईल, वैयक्तिक गट परतावा योजनेसाठी लाभार्थीची (इतर मागासवर्गीय) कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा र.८ लाख आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वय १८ ते ५० पर्यंत, कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील, महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य, उमेदवाराने अर्ज करतेवेळी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, बँकेचा/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, कुटुंबातील एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळ जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. जिल्हा कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर पुढीलप्रमाणे पत्ता-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र बी, स नं.१०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे-४११००६ फोन- ०२०-२९५२३०५९ असा आहे.

Comments are closed

error: Content is protected !!