जळगाव, दि.२४(punetoday9news):- कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जन्मभूमीचा (आसोदा) मी जनसेवक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. बहिणाबाई या समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खर्या अर्थाने समाजसुधारक होत्या. असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त आसोदा येथील बहिणाबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पालकमंत्री उपस्थितांशी बोलत होते.
बहिणाबाईंच्या स्मारकासाठी लवकरच दोन कोटी रूपयांची तरतूद करणार असून हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले, बोली भाषेतील बहिणाबाईंच्या कविता, गाणी सर्वव्यापी व सर्वस्पर्शी आहेत. निसर्ग, शेतकरी, शेती, स्त्रियांच्या व्यथा, विनोद, अध्यात्म अशा सर्व विषयांना त्यांनी कवितेतून जगासमोर मांडले. बहिणाबाई या समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खर्या अर्थाने समाज सुधारक होत्या. असेही आवर्जून सांगितले.
Comments are closed