मुंबई,दि.२४(punetoday9news):- काँगेस पूर्णवेळ अध्यक्ष पदाचा वाद उफाळून आला असताना त्यात विजय वडेट्टीवारांनी केलेल्या विधानाने राज्यात राजकीय भूकंप होणार का ? असे चित्र निर्माण झाले आहे . आजची काँग्रेस कार्यसमितीची बैठक आज देशभरात चर्चेचा विषय ठरली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी गांधी यांना लिहिलेल्या पत्रानंतर निर्माण झालेल्या गदारोळाने बैठक बोलवण्यात आली. बैठकीत पत्रावरून दोन गटात जोरदार चर्चा झाली . व नव्या नेतृत्व निवडीबद्दलही चर्चा होऊन शेवटी पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणूनच निवड झाली
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनीही हीच भूमिका घेतली आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाविषयी बोलतानाच राज्यातील काँग्रेसचे नेते आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरचे संबंध तोडण्यास सांगितले तर?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले,”जर राहुल गांधींनी आम्हाला सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितले, तर आम्ही तात्काळ बाहेर पडू. आम्ही एक दिवसही सरकारमध्ये राहणार नाही,”
राज्यातील काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘पीटीआय’शी बोलताना काँग्रेसमधील सध्याच्या चर्चेवर स्पष्ट भूमिका मांडली. काँग्रेस लोकशाही मूल्यांचं प्रतीक आहे. पूर्णवेळ अध्यक्षांची मागणी करण्याबाबत पक्षातील काही नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलेलं आहे, ते पत्र सध्याच्या नेतृत्वाला विरोध दर्शवून लिहिलेले नाही. वडेट्टीवार म्हणाले,”काँग्रेस पक्ष हा लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे म्हणूनच जे पत्र सोनिया गांधींना लिहिले आहे, त्याकडे सध्याच्या नेतृत्वाला विरोध म्हणून पाहिले जाऊ नये.”

Comments are closed

error: Content is protected !!