मुंबई,दि.२४ (punetoday9news):- राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १४ हजार २१९ रुग्ण बरे झाले तर ११ हजार १५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.४७ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ०२ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६८ हजार १२६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले ११,०१५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २१२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७४३ (२०), ठाणे- ११५ (५), ठाणे मनपा-१३२ (६), नवी मुंबई मनपा-३२९ (१), कल्याण डोंबिवली मनपा-१९२ (१), उल्हासनगर मनपा-१५ (१६), भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-७४ (४), पालघर-४६, वसई-विरार मनपा-१२० (२), रायगड-१३८ (५), पनवेल मनपा-१३८, नाशिक-१७५ (२), नाशिक मनपा-६९९ (४), मालेगाव मनपा-४० (१), अहमदनगर-२७० (७),अहमदनगर मनपा-१२८ (२), धुळे-२२२ (४), धुळे मनपा-११४ (२), जळगाव-५३९ (१५), जळगाव मनपा-११० (३), नंदूरबार-११८, पुणे- ३८२ (४), पुणे मनपा-११०७ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-८१५ (४), सोलापूर-३१० (९), सोलापूर मनपा-५७ (१), सातारा-४४६ (१०), कोल्हापूर-४२६ (७), कोल्हापूर मनपा-२४३, सांगली-१५२ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७२ (३), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-९६ (२), औरंगाबाद-१६३ (४),औरंगाबाद मनपा-१७८ (२), जालना-३३ (१), हिंगोली-५, परभणी-२० (१), परभणी मनपा-३०, लातूर-५६ (४), लातूर मनपा-२८ (३), उस्मानाबाद-२०२ (१),बीड-१३८ (७), नांदेड-९४ (२), नांदेड मनपा-७३ (२), अकोला-३९, अकोला मनपा-८, अमरावती-४४, अमरावती मनपा-९४, यवतमाळ-६२, बुलढाणा-६२, वाशिम-५३ (१), नागपूर-१७८ (३), नागपूर मनपा-४७८ (१५), वर्धा-५, भंडारा-१६ (१), गोंदिया-४० (२), चंद्रपूर-१६, चंद्रपूर मनपा-३१ (१), गडचिरोली-५, इतर राज्य २४ (२).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ नमुन्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९२ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.
Comments are closed