महाड,दि.२५(punetoday9news):- महाड येथील काजळपुरा येथील इमारत दुर्घटनेत आत्ता पर्यंत ७ जण जखमी असून १९ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ च्या ३ बचाव पथकाकडुन शोध कार्य चालू आहे. ६० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.यात एक सहा वर्षाचा चिमुकला मोहम्मद सुखरूप बाहेर आला असून त्याची आई व दोन भावंडे अडकलेली आहेत.
या प्रकरणी जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दुर्घटनेदिवशी बीमचे प्लास्टर तुटले होते. ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. अजूनही आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे . प्रत्यक्षदर्शीं इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जात आहे . त्यामुळे याप्रकरणी जो कोणी दोषी आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Comments are closed