शाळांबाबत प्रश्न चिन्ह कायम

दिल्ली,दि.२५( punetoday9news ):- केंद्र सरकार पुढच्या महिन्यापासून अनलॉक ४.० लागू करणार आहे. यासाठीची सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर होऊ शकतात. जर सूत्रांच्या माहितीनुसार सरकार १ सप्टेंबर पासून अनेक उपक्रमांवरील बंदी हटविण्याची घोषणा केली जाऊ शकते तसेच कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अनलॉक ४.० च्या किती तरतुदी लागू होतील, हे त्या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सद्य परिस्थितीवर अवलंबून असु शकते.

लोकल गाड्या सुरू करणे, मेट्रो ट्रेन सेवा, एकपडदा नाट्यगृह, हॉल, सभागृह, असेंब्ली हॉल आणि अशा इतर काही ठिकाणे चालू करण्यासंदर्भात केंद्र सरकार कडून वेगवेगळ्या चर्चा या असल्याची माहिती आहे.तसेच वेगवेगळी मते देण्यात आली आहेत. या सूचनांच्या आधारे केंद्र सरकार अनलॉक ४.० अंतर्गत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून लोकल ट्रेन आणि मेट्रो ट्रेन सेवा सुरू करण्याचा विचार करीत आहे. मात्र त्याचवेळी त्यासंदर्भात कठोर नियमाचे पालन करण्याच्या सूचना हि देण्यात येतील ज्यांचे पालन करणे बंधनकारक असू शकते यात सामाजिक अंतर, थर्मल स्क्रीनिंग, तापमान तपासणी, गर्दी क्षमता यासारख्या बाबी असतील.

 

advertise:-

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!