महाड,दि.२५(punetoday9news ):- महाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरसह तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये बिल्डर फारूक काझी याच्यासह आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे , वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड , अभियंता शशिकांत दिघे यांचा समावेश आहे . साधारणपणे पाच वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम झाले होते . गेल्या काही महिन्यांपासून ही इमारत हेलकावे खात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. शिवाय तिच्या पिलर ला क्रॅक जाऊन पिलरचा काही भाग तुटला होता मात्र, या तक्रारींकडे त्यांनी
जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समजत आहे.
Comments are closed