पुणे,दि.२५(punetoday9news):- पुण्यात घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी फिरते हौद चालू केले मात्र मनसे व ब्राह्मण महासंघाने त्याला विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

त्यांच्यामते महापालिकेने गणपती विसर्जनासाठी बनवलेले फिरते हौद म्हणजे कचराकुंड्या आहेत . आम्ही गणरायाला या कचरा कुंडीच्या बनवलेल्या हौदात विसर्जित करू देणार नाही . महापालिकेने भक्तांच्या भावनेचा विचार करावा . कचरा विघटित करणे व बाप्पा विसर्जित करणे या दोन वेगळ्या गोष्टी महापालिकेने समजून घ्याव्यात असेही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर गणपती मूर्ती विसर्जनासाठी बनवलेले फिरते हौद हे कचरा उचलणारे कंटेनरच असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. . मात्र, महापालिकेने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
यावर एका प्रतिक्रिया देताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत . ते म्हणाले कि मागील वर्षी विसर्जनासाठी नेमलेल्या कंपनीलाच यंदाही कंत्राट दिले आहे त्यांच्याकडून एका कंटेनर ला रंग देणे बाकी होते मात्र कचरा उचलणारे कंटेनर यासाठी वापरले जात नाहीत .

यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे प्रशासनाने घरगुती गणपतीचं विसर्जन घरीच करावं, असं आवाहन पुणेकरांना केलं. त्यानंतर महापालिकेकडून १५ क्षेत्रीय भागात ३० फिरते हौद ठेवले आहेत. काल दीड दिवसांच्या गणपतीच विसर्जन बहुतेक जणांनी याच हौदात केले काल विसर्जन सुरु असताना हौदामधील विसर्जन मनसेने बंद पाडले. तसेच हे हौदामधील विसर्जन थांबवले नाही तर हौद पाडून टाकू, अस म्हटले आहे .
त्यामुळे  भक्तांसमोर  गणपती बाप्पाचे  विसर्जन करण्याचा पेच पडला आहे.

Comments are closed

error: Content is protected !!