अनाथ आश्रमात फळ वाटप व दिव्यांगाना आर्थिक मदत.
पिंपरी, दि.२५(punetoday9news):- पिंपरी चिंचवड मधील नवी सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक अमित पसरणीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर मधील करूणालय बालगृह येथे मित्रपरिवाराच्या वतीने ८०डजन फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी आश्रमाचे अध्यक्ष बनसोडे सर, रोहन चौगुले, सुधीर कवाळे, अमर गडकरी, रोनित चौगुले, विराज भोसले उपस्थित होते.
तर स्वतः अमित पसरणीकर यांनी मुलीच्या हस्ते नवी सांगवीतील अंध व्यक्ती संजय पाटोळे यांना ५,५०० रूपयांचा मदतरूपी धनादेश मुलगी श्रेया पसरणीकर हिच्या हस्ते देण्यात आला.
नवी सांगवी, सांगवी परिसरात अमित पसरणीकर विविध सामाजिक कार्यात सहभागी असून गरजवंताना मदत कार्यात पुढे असतात. त्यांनी केलेल्या मदतीबद्दल बालगृहाच्या वतीने आभार मानले तसेच विविध सामाजिक स्तरातून कौतुक केले जात आहे.
जाहिरात:-
Comments are closed