मुंबई, दि.२६(punetoday9news):- मुंबई उच्च न्यायालयाने पतीच्या संपत्तीवर पहिल्या पत्नीचाच हक्क असेल असा निर्णय दिला आहे. दोन्ही पत्नीच्या मुलांचा मात्र संपत्तीवर तितकाच हक्क असेल असेही कोर्टाने म्हटले आहे.
एखाद्या व्यक्तीला दोन पत्नी असतील तर त्या व्यक्तीच्या संपत्तीवर पहिल्या पत्नीचाच अधिकार असेल असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. रेल्वे पोलीस दलातील उपनिरीक्षक सुऱेश हातणकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून ६५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पैसे वाटणीचा वाद निर्माण झाला कारण हातणकर यांना दोन पत्नी असल्याने सदरील मदतीच्या रकमेवर दोन्ही पत्नींनी दावा केला होता. याचा अनुषंगाने दुसऱ्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सदरील निर्णय देण्यात आला आहे.
न्यायालयाने म्हटले कि ‘दुसऱ्या पत्नीला काहीही मिळणार नाही असं कायदा सांगतो. पण दुसऱ्या पत्नीपासून असणारी मुलगी तसेच पहिली पत्नी आणि त्यांच्या मुली यांना ही रक्कम मिळेल.’ असे न्यायालयाने नमूद केले आहे.
Advertise:-
Comments are closed