बार्षी,दि.२६(punetoday9news):- बार्शी तालुक्यात भरदिवसा पाळण्यात झोपलेल्या आपल्या स्वतःच्या नऊ महिन्याच्या बाळाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून आईनेच खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. बार्शी तालुक्यातील वांगरवाडी गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जन्मदात्या आईला अटक केली.
या घटनेमुळे बाशी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातही अशाच पद्धतीने आईने स्वतःच्या मुलीची हत्या केली होती आता याच प्रकाराची पुनरावृत्ती पाहून स्वतः आईच वैरी कशी बनते हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अश्विनी तुपे ( वय २३ ) असे अटक केलेल्या आईचे नाव असून तिने गुन्हा केल्याचे कबूल केला असल्याची माहिती बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार,२२ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास दोन व्यक्तींनी आरोपीच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपी किचनमध्ये काम करत असताना चिमुकल्याचा रडण्याचा आवाज आल्याने बाहेर आले. तेव्हा एका हाफ पॅन्ट आणि बनेल घातलेली व्यक्ती आरोपीच्या बाळाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळत होता. म्हणून आरोपीने आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी क्षमायाचना केली. पण तरी सुद्धा हल्लेखोरांनी बाळाचा गळा आवळून बाळ जमिनीवर टाकले आणि मारहाण करुन हातपाय बांधून घरातील कपाट उचकटले. त्यात काहीच न सापडल्याने गळ्यातील २ ग्रॅम सोन्याचे गंठण चोरांनी नेल्याचा बनाव पोलिसांसमोर केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे
दरम्यान, बार्शी ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून, ही हत्या चक्क जन्मदात्या आईनेच केल्याचं पोलीस तपासात समोर आले. अश्विनी तुपे यांना दोन मुले होती. त्यातील मोठा मुलगा आणि मृत छोटा मुलगा यांच्या वयात खूप कमी अंतर होते. म्हणून दोन्ही मुलांना संभाळण्याचा कंटाळा आल्याने अश्विनी यांनी आपल्या ९ महिन्याच्या सार्थक याची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. पोलिसांनी अश्विनी तुपे हिला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Comments are closed