मुंबई, दि.२६(punetoday9news):- प्रशासन व नियमांचे कठोर पालनाबाबद आग्रही असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य या पदावर बदली करण्यात आली आहे.
कालच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने वृत्त होते. मुंढेंनी नागपूर महापालिका आयुक्त पदी असताना कोरोना विरुद्ध विविध उपाययोजना राबवल्याने तिथे कोरोनाचा प्रसार होण्यात अटकाव झाला होता असे बोलले जात आहे. मात्र नागपूर महापालिका महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात कित्येक विषयावर मतभेद होते हे सर्वश्रुत आहे. संदीप जोशी यांनी मात्र या बदलीची मागणी भाजपाने केली नसल्याचे स्पष्ट केले आहे तसेच महाराष्ट्र शासन या बाबत निर्णय घेते त्यामुळे बदलीचे कारण तेच सांगू शकतील असे सांगितले आहे.
Comments are closed