पुणे,दि.२६(punetoday9news):- पुण्यात आज सिरम इंन्स्टिट्युट व ऑक्सफर्ड विद्यापीठाने संशोधित केलेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून भारती हॉस्पिटलमध्ये हा पहिला डोस दिला गेल्याची माहिती राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे.
पुण्यातील आज पाचपैकी दोन स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे. लस देण्याआधी त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता पुढील चार ते सहा महिने या दोघांचे निरीक्षण केले जाणार आहे. म्हणजेच लस परिमाणकारक आहे की नाही यासाठी अजून किमान सहा महिने वाट पहावी लागणार आहे.
स्वतःवर मानवी चाचणी करून घेण्यासाठी पाच जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी तिघांमध्ये कोरोना अँटिबॉडीज सापडल्याने केवळ दोघांनाच आज ही लस देण्यात आली आहे .
कोरोना रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष कोरोना लसीवर लागून राहिले आहे.
Comments are closed