मुंबई,दि.२६ (punetoday9news):- मराठा आरक्षणप्रकरणी आजच्या सुनावणी दरम्यान मध्यस्थांचे वकिल कपिल सिब्बल आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे वकिल नरसिंह यांनी जोरदार युक्तीवाद केला.आजच्या सुनावणी दरम्यान कोणताही निर्णय झाला नसून याप्रकरणी आता पुढची सुनावणी २८ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.

११ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे मराठा आरक्षण प्रकरण वर्ग करायला हवं अशी मागणी कोर्टात कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना केली. तर इंद्रा सहानी प्रकरणाचा दाखला देत मुकुल रोहतगी यांनी मराठा आरक्षण प्रकरणाची चर्चा मोठ्या खंडपीठात व्हावी अशी मागणी केली. सुरुवातीला युक्तिवाद कोण करणार यावरून सिब्बल आणि रोहतगी यांच्यात वाद झाला. आमची याचिका मुख्य असल्याने आम्हाला आधी संधी मिळावी असे रोहतगी म्हणाले तर सिब्बल यांनी मध्यस्थाच्यावतीने बाजू मांडली. दरम्यान, ५० % आरक्षणाची फेररचना होणे सध्या समाजात अनेक सामाजिक, आर्थिक प्रश्न नव्याने तयार होत असल्याने आवश्यक असल्याची वकिल नरसिंह यांनी भूमिका मांडली.

Comments are closed

error: Content is protected !!