भोसरी,दि.२७(punetoday9news):- भोसरी येथील संगमेश्वर एज्युकेशन ट्रस्ट संचालित सिद्धेश्वर हायस्कूल च्या स्वयंघोषित पदाधिकारी यांच्या अनागोंदी व मनमानी कारभारा मुळे शाळेत अनेक आर्थिक घोटाळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आर्थिक छळवणूक, P.F.घोटाळे, विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांचा अभाव, पालक समिती नसणे , शिक्षकांना विनाकारण निलंबित करणे, पगार थकवणे यासारख्या अनेक प्रकारचा अनागोंदी कारभार संस्थेत गेले अनेक वर्षे सुरू आहे.
यासंदर्भात या संस्थेतील पीडित शिक्षकांची तक्रार मनसेचे भोसरी विधानसभा अद्यक्ष अंकुश तापकीर यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच ॲड.रूपाली पाटील यांच्या मार्गदर्शशनाखाली, गणेश पाटील , अंकुश तापकीर (विभाग अद्यक्ष- भोसरी विधानसभा) यांनी आज शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, सह संचालक, प्रशासन अधिकारी यांना निवेदन दिले.
यावर शिक्षण संचालक यांनी तात्काळ निर्णय घेऊ व चौकशी साठी अधिकारी नेमून अहवाल प्राप्त करू,असे आश्वासन मनसेला दिले आहे .या वेळे सदर संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed