महाड,दि.२७(punetoday9news):- महाड इमारत दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब गमावलेल्या मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग या चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांचे पालकत्व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे.
दोन्ही लहान मुलांचं पालकत्व स्वीकारण्यामागे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग हा चिमुरडा इमारतीतून बाहेर पडण्यास यशस्वी ठरला. मात्र, त्याचे संपूर्ण कुटुंब या दुर्घटनेचं बळी ठरलं. त्याचे आई-वडिलांचं छत्र हरपलं. दुसरीकडे मोहम्मद बांगी या चार वर्षांच्या चिमुकल्याची आई आणि भावंडांचा या दुर्घटनेत दुर्देवी अंत झाला. मोहम्मदलासुद्धा तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात एनडीआरएफ पथकाला यश आले होते . मोहम्मद आणि अहमद दोघांचं आई-वडिलांचं छत्र नसल्याने मानवतेच्या नात्याने व बाळासाहेब ठाकरेंच्या आदर्शांनुसार एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पालकत्व स्वीकारलं.
Advertise:-
Comments are closed