पुणे,दि.27( punetoday9news):- पुणे विभागातील 1 लाख 53 हजार 870 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 10 हजार 367 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 50 हजार 837 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5 हजार 660 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.14 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 53 हजार 141 रुग्णांपैकी 1 लाख 18 हजार 590 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 30 हजार 887 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 664 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.39 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.44 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 138 रुग्णांपैकी 6 हजार 300 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 505 आहे. कोरोनाबाधित एकूण 333 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 659 रुग्णांपैकी 12 हजार 40 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 921 आहे. कोरोनाबाधित एकूण 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 9 हजार 385 रुग्णांपैकी 5 हजार 36 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 989 आहे. कोरोनाबाधित एकूण 360 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 20 हजार 44 रुग्णांपैकी 11 हजार 904 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 535 आहे. कोरोनाबाधित एकूण 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 918 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 244, सातारा जिल्ह्यात 485, सोलापूर जिल्ह्यात 250, सांगली जिल्ह्यात 499 तर कोल्हापूर जिल्ह्यात 440 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 78 हजार 119 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 10 हजार 367 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Comments are closed

error: Content is protected !!