मुंबई, दि.२७( punetoday9news):-
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक धोरण, यासह दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्न प्राधान्याने सोडविणार असून दर आठवड्याला याबाबत बैठक आयोजित करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत दूरदृश्यप्रणालीव्दारे आयोजित बैठकीत मुंडे होते. दिव्यांग बांधवांच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्याची आपली भूमिका असून, या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन घेऊन आपण स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागासाठी प्रयत्नशील असून मार्चपासून कोरोनामुळे मंदावलेल्या कामांना वेग देण्याबाबत सूचना संबंधितांना यावेळी केल्या.
दिव्यांगांसाठीच्या विशेष शाळांची नोंदणी सुलभ करणे तसेच विविध विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे जसे की श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव आदी उपलब्ध करून देण्यासाठी २०१५ मध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला
Comments are closed