मुंबई, दि. २८(punetoday9news):- विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षांबाबतीत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार परीक्षेची तारीख बदलता येऊ शकते मात्र परीक्षा रद्द करता येणार नाही.
परीक्षांसंदर्भात यूजीसीच्याच निर्णयावर सुप्रीम कोर्टानेही शिक्कामोर्तब केले. यूजीसीच्या ६ जुलैच्या गाईडलाईन्सनुसार ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितले होतेे. ही तारीख राज्य सरकारला पुढे ढकलता येईल मात्र परीक्षाच नको असे म्हणता येणार नाही. ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ न शकणाऱ्या राज्यांनी परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यासाठी यूजीसीशी संपर्क करावा. कोर्टाने असे सांगितले . तसेच एखाद्या राज्याचे जर परीक्षा घ्यायचीच नाही असे मत असेल तर त्यांनी यूजीसीशी संंपर्क करून चर्चा करावी असे कोर्टाने म्हटले आहे.
Advertise:-
Comments are closed