दिल्ली, दि. २८(punetoday9news):- जीएसटीची थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र सरकार हतबल असल्याचे सांगण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Act of God चा हवाला केंद्रीय अर्थमंत्री निzर्मला सीतारामन यांनी दिला आहे.

अर्थमंत्री निर्मला यांनी Act of God (‘देवाची करणी’) चा उल्लेख केल्यानंतर गुगलवर त्यासंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.

गुगल ट्रेंडनुसार जीएसटी परिषद संपल्यानंतर यासंदर्भातील सर्वाधिक सर्च हे महाराष्ट्रामधून करण्यात आले आहे. अगदी ट्विटरपासून ते बातम्यांपर्यंत Act of God या तीन शब्दांची चर्चा पाहायला मिळाली

Act of God म्हणजे नक्की काय?

ही टर्म प्रामुख्याने विम्यासंदर्भात तसेच कायदेशीर बाबींमध्ये वापरली जाते. यानुसार एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेसाठी कोणालाच जबाबदार धरता येत नाही. ती घटना घडून जाणे हे निर्सगामुळे होतं आणि त्याला कोणीच काही करु शकत नाही असं सांगण्यासाठी Act of God चा वापर करतात. 

गुगल ट्रेण्डच्या आकडेवारीवरुन सर्वाधिक सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राखालोखाल दिल्ली, कर्नाटक, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक लागला आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!