मी व फडणवीस एकत्र उपस्थित म्हणजे लगेचच ब्रेकिंग न्युज उपमुख्यमंत्र्यांचा मिश्किल टोला.
पुणे, दि. २८(punetoday9news):- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना कदाचित हे माहीती नव्हते की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलपण येणार आहेत असा मिश्किल टोला उपमुख्यमंत्र्यांनी लगावला. त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ निर्माण झाला. राजकीय भूमिका आणि मते वेगवेगळी असू शकतात, मात्र निवडणूक झाल्यावर सगळं विसरुन जावे.
“आपण फिजिकल डिस्टन्सचे पालन केले पाहिजे, मास्क वापरला पाहिजे त्याचबरोबर पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर परिसरात मास्क वापरला नाही तर १हजार रु. दंड आकारला पाहिजे” असे त्यांनी सांगितले. जुन्नर, खेड, आंबेगाव,शिरुर या ग्रामीण भागातील रुग्णदेखील जम्बो रुग्णालयात येतील. यामध्ये शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव होणार नाही. हॉस्पिटलची भरभराट होऊ दे, असं बोलावंसं वाटत नाही, अशी मिश्कील टोलाही त्यांनी लगावला.
“महाराष्ट्रात रोज १४ ते १५ हजार रुग्ण आढळत आहेत. पिंपरी चिंचवडचा रिकव्हरी रेट ८५ टक्के आहे. यासाठी महापालिका आणि शासनाचे आभार” असे मोजक्या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले.
Comments are closed