मुंबई, दि. २८(punetoday9news):- सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

परीक्षेसंदर्भातील कार्यपद्धतीमध्ये समाविष्ट असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य ,प्राध्यापक, पोलीस व इतर सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाने कोविड-१९ संदर्भात दिलेल्या सर्व सुरक्षिततेचा प्रोटोकॉल व नियमांचे पालन करुन परीक्षा कशा घेता येतील याबाबत सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासमवेत सर्वांगीण विचार करून परीक्षा कधी, कशा व कोणत्या पद्धतीने विद्यापीठ परीक्षा घेईल या संदर्भात निर्णय घेण्यात येईल

Comments are closed

error: Content is protected !!