मुंबई, दि. २८(punetoday9news):- लॉकडाऊनच्या काळात भरमसाट वीजबिलाने नागरिक हैराण झाले असताना थोडा दिलासा देण्याची राज्य सरकारची घोषणा बारगळणार असेच चित्र निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वित्त विभागाने त्याबद्दल अनुदान देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्र्यांची ती घोषणा फसवी होती का? असा सवाल माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.
कोरोनाच्या संकटात जनतेला मदत करण्यासाठी वेळ पडल्यास राज्य सरकारांनी कर्ज काढावे, अशी परवानगी आधीच केंद्र सरकारने देऊ केली आहे. मात्र, राज्यातील जनतेला दिलासा देण्याची इच्छा नसलेले राज्य सरकार त्याचाही फायदा करून घेत नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. वीज बिलात बाराशे युनिटपर्यंतच्या सुटीबाबतच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारू असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
वीजबिलातून दिलासा मिळण्यासाठी आवश्यक २हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव अजूनही वित्त आणि नियोजन विभागाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे वीजबिलात सूट कधी मिळणार याबाबत अनिश्चितता दिसत आहे.
तर वीजबीलाच्याा विषयावर बोलताना महसूल मंत्री बाााळासाहे थोरात म्हणाले की सरकारला हा निर्णय घ्यावा लागणार आहे की त्यांना वीज बिलात सवलत द्यायची आहे का? असल्यास हा निधी कसा उभा करणार हा देखील प्रश्न आहे. दरम्यान, वीज ग्राहकांना मदत करायची आमची भावना आहे, याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. योग्य वेळी निर्णय घेऊ.
Advertise:-
Comments are closed