‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू किशोरी शिंदेंकडून २१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द
पुणे, दि. २८(punetoday9news):- ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड -१९’साठी उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू तथा पुणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त किशोरी शिंदे आणि त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी डॉ प्रदिप तोडमल यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-१९ साठी देण्यात आली आहे. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप मोहिते, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.
Comments are closed