घाबरू नका पण काळजी घ्या.
वैद्यकीय सेवा देणाऱ्या योद्ध्यांचा सामाजिक जनजागृतीसाठी पुढाकार.
पिंपरी,दि.२८(punetoday9news):- पिंपरी चिंचवड मधील लुंकड हॉस्पिटल दापोडी मधील डॉ.दिलीप लुंकड यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटल कर्मचारी वर्गाने एक सामाजिक संदेश देणारा देखावा तयार केला आहे.
आज संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून आपल्या परिसरातील नागरिकही कोरोना च्या जाळ्यात सापडले आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी कोणत्या उपाययोजना आत्मसात करायला हव्यात हे खूप महत्वाचे आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर , सॅनिटायजरचा वापर नागरिकांनी करावा तसेच कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांशी आपलेपणाची वागणूक असावी. त्याचप्रमाणे कोरोना बद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज व भीतीचे वातावरण आहे. ती भीती कमी होवुन लोकांनी काळजी घ्यावी साठी या देखाव्यातून जनजागृती करण्यात आली आहे.
Comments are closed