मुंबई, दि. २८(punetoday9news):-
राज्यात आज ११ हजार ६०७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६२ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८० हजार ७१८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १४,३६१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३३१ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :
मुंबई मनपा-१२१७ (३०), ठाणे- २१८ (१), ठाणे मनपा-२०९ (७), नवी मुंबई मनपा-४२७ (९), कल्याण डोंबिवली मनपा-२४३ (८), उल्हासनगर मनपा-२० (२), भिवंडी निजामपूर मनपा-२८ (१), मीरा भाईंदर मनपा-१६६ (४), पालघर-१२० (४), वसई-विरार मनपा-११२ (२), रायगड-२५३ (६), पनवेल मनपा-२८३, नाशिक-१९५ (१५), नाशिक मनपा-४९१ (१२), मालेगाव मनपा-३६ (२), अहमदनगर-३७२ (१),अहमदनगर मनपा-१७२ (२), धुळे-९५ (४), धुळे मनपा-११६ (५), जळगाव- ४७८ (९), जळगाव मनपा-१०५ (४), नंदूरबार-७५ (३), पुणे- ८५१ (१४), पुणे मनपा-१७९५ (२२), पिंपरी चिंचवड मनपा-१००१ (२२), सोलापूर-२९७ (९), सोलापूर मनपा-३२, सातारा-६७७ (९), कोल्हापूर-५५४ (१७), कोल्हापूर मनपा-१६९ (५), सांगली-२७० (९), सांगली मिरज कुपवाड मनपा-३४६ (१५), सिंधुदूर्ग-२० (४), रत्नागिरी-१०२ (४), औरंगाबाद-१०१ (४),औरंगाबाद मनपा-८० (८), जालना-६१ (१), हिंगोली-३६ (३), परभणी-३७ (१), परभणी मनपा-२४ (३), लातूर-७७ (५), लातूर मनपा-६९ (३), उस्मानाबाद-१३८ (२),बीड-६४ (५), नांदेड-१४२ (१), नांदेड मनपा-११४, अकोला-४५, अकोला मनपा-१७, अमरावती-२६ (४), अमरावती मनपा-७७ (४) , यवतमाळ-१०३ (२), बुलढाणा-९४ (१), वाशिम-४३ (२), नागपूर-३११ (२), नागपूर मनपा-८४८ (१९), वर्धा-३६, भंडारा-३४, गोंदिया-७८, चंद्रपूर-७५, चंद्रपूर मनपा-२६, गडचिरोली-४६, इतर राज्य १४.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३९ लाख ३२ हजार ५२२ नमुन्यांपैकी ७ लाख ४७ हजार ९९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.०२ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ०१ हजार ३४६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ९०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१८ टक्के एवढा आहे.
Comments are closed