नांदेड,दि.२९(punetoday9news):- डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची प्रकृती उत्तम आहे अशी माहिती आश्रमाकडून देण्यात आली आहे . त्यांच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवाचार्य महाराज १०४ वर्षांचे असुुन त्यांचे देशभरात भक्त आहेत.

शुक्रवारी दि.२८ ऑगस्ट रोजी महाराजांच्या जिवंत समाधीच्या अफवेने अहमदपूर येथील आश्रमात भक्तांनी मोठी गर्दी केली.  कोरोना संसर्गाचा धोका असतानाही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता . आता त्यांच्या भक्तांकडून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.पसरलेल्या अफवेनंतर आश्रमाकडून शिवाचार्य महाराज समाधी घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.  मात्र, तोपर्यंत त्यांच्या लातूरमधील आश्रम परिसरात भक्तांनी  मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

सोशल मेडियाच्या गैरवापराने अशा अफवा वारंवार घडत असल्याने पोलिस प्रशासनाची डोकेदुखी मात्र वाढत आहे.

Comments are closed

error: Content is protected !!