दिल्ली,दि. २९(punetoday9news):-  कोरोना संसर्ग झाल्याने अगोदरच त्रस्त असलेल्या csk टीम ला   आयपीएल२०२० मधून सुरेश रैनाच्या माघार घेण्याने मोठा झटका बसला आहे.

चेन्नई सुपरकिंग्समधील आघाडीचा फलंदाज सुरेश रैनाने घरगुती कारणामुळे आगामी आयपीएलमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपरकिंग्ससाठी सर्वात जास्त आणि आयपीएलच्या इतिहासात नंबर २ च्या सर्वात जास्त धावा करणारा सुरेश रैना यंदा खेळणार नसल्याने चेन्नईच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

सीएसकेचे सीईओ यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. ते म्हणतात, सुरेश रैना खासगी कारणांमुळं भारतात परतला आहे आणि तो आगामी आयपीएल सीझनसाठी उपलब्ध होणार नाही.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!