पिंपरी, दि. २९( punetoday9news):- पिंपरी चिंचवड मधील सांगवी येथे गणेश विसर्जनासाठी  विसर्जन रथाची सोय करण्यात आली होती. 

कोरोना संसर्गाच्या धरतीवर सर्व धर्मीयांचे सण, उत्सव शांततेत शासनाचे नियम पाळून साजरे केले जात आहेत त्यानुसार सांगवी परिसरातील नागरिकांना आपल्या घरगुती गणपती बाप्पाचे विर्सजन करण्यात सहकार्य म्हणून  शिवसेना सांगवी विभागाच्या वतीने गणेश विर्सजन रथाची सोय करण्यात आली होती.

या उपक्रमांस सांगवी – नवी सांगवी येथील ३०० घरगुती गणपतीचे संकलन करुन त्या गणेश मुर्त्या सांगवीतील महापालिकेच्या शाळेतील स्वंयसेवकांकडे सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी सिंकदर पोंगडे, विजयराज साने (उपशहर प्रमुख),चेतनदादा शिंदे (विभाग प्रमुख) शिवसैनिक उमेश पवार, अमित खरात, राज शिंदे उपस्थित होते.

Advertise:-

 

 

Comments are closed

error: Content is protected !!