पिंपरी, दि.२९(punetoday9news):- संपूर्ण जगभरात कोरोना ने थैमान घातले असून सर्वसामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. कोरोना विषाणू समूळ नष्ट होणे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असल्याने नागरिकांची चिंता अजूनच वाढली आहे. जुनी सांगवीतील शिंदेनगर येथील भागवत कुटुंबीयांनी कोरोना मुळे सर्व सामान्यनागरिकांपासून सर्व स्तरावर झालेला परिणाम आपल्या घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीतून सादर केला आहे. 

कैलास भागवत व सुपुत्र विकास भागवत हे दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान आपल्या घरगुती गणपती सजावटीतही नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. आपण छोट्या उपक्रमातूनही समाजात चांगले परिवर्तन घडवून आणू शकतो हा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे या वर्षी त्यांनी कोरोना मुळे हाॅटेल्स, मंदिर, धार्मिक स्थळे, हाॅस्पिटल, कारखाने, छोटे व्यावसायिक ,कामगार वर्ग यांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागले हे दाखवले आहे तर याचबरोबर पर्यावरणावर झालेले परिणाम हे प्रात्यक्षिक रूपात दाखविण्यात आले आहेत.

तसेच कोरोना विरूद्धचा लढा लढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशा स्वरूपाच्या सूचना माहिती फलकांच्या माध्यमातून दिल्या आहेत.

या सजावटीचे सामाजिक स्तरातून कौतुक केले जात आहे तसेच दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या या परिवाराकडून इतर नागरिकांनी ही बोध घेत समाजउपयोगी देखाव्यावर भर द्यावा असे नागरिकांचे मत आहे.

Advertise:-

 

 

Comments are closed

error: Content is protected !!