पुणे,दि.29(punetoday9news):- पुणे विभागातील 1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 818 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 54 हजार 274 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5 हजार 934 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.86 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 60 हजार 455 रुग्णांपैकी 1 लाख 23 हजार 595 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 हजार 63 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.3 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 218 रुग्णांपैकी 6 हजार 787 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 74 आहे. कोरोनाबाधित एकूण 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 121 रुग्णांपैकी 12 हजार 624 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 781 आहे. कोरोनाबाधित एकूण 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 293 रुग्णांपैकी 5 हजार 656 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 227 आहे. कोरोनाबाधित एकूण 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 731 रुग्णांपैकी 12 हजार 948 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 129 आहे. कोरोनाबाधित एकूण 654 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 612 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 611, सातारा जिल्ह्यात 575, सोलापूर जिल्ह्यात 268, सांगली जिल्ह्यात 463 तर कोल्हापूर जिल्ह्यात 695 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत (दि.28) विभागामध्ये एकुण 10 लाख 18 हजार 428 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 21 हजार 818 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Comments are closed

error: Content is protected !!