मुंबई, दि. २९ (punetoday9news):- राज्यातील कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार परिक्षेसंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली.
बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे अपर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ.धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, माजी कुलगुरू राजन वेळूकर, विजय खोले उपस्थित होते.
बैठकीत विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचना, सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरुंनी बैठकीत दिलेल्या सूचना, राज्यातील कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि विद्यार्थी, पालक यांच्या परीक्षेसंदर्भातील सूचना, निकालाची प्रक्रिया, शैक्षणिक वर्ष या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
Comments are closed