दिल्ली, दि. २९ (punetoday9news):- केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात अनलॉक ४ च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार ७ सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच कंटेन्मेंट झोनच्या बाहेर सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र देशभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
गाईडलाईन्सनुसार येत्या ७ सप्टेंबरपासून अटी-शर्तींसह मेट्रो सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस मात्र ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे.
तर ओपन एअर थिएटर हे २१ सप्टेंबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय येत्या २१ सप्टेंबरपासून सामजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांना १०० लोकांसह परवानगी दिली आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर लॉकडाऊन लावू नये अशी सूचनाही राज्यांना देण्यात आली आहे.
Comments are closed