मुंबई, दि. ३०(punetoday9news):- घंटानाद आंदोलनावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, “मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा होता. मंदिरे अचानक उघडली तेव्हा काय झाले ? राम मंदिराचे भूमिपूजन, तिरुपती असा सर्वच कोरोनाचा प्रसार झालेला दिसला. देव मंदिरात बंदिस्त व्हावे, ही आमची भूमिका नाही. कोरोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की कोरोना ही देवाची करणी आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोलाही लगावला.
मंदिरावर अनेकांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत. देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही आमची भूमिका नाही, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. आर्थिक उलाढाल थांबल्याची चिंता आम्हालाही आहे. मात्र लोकांच्या आरोग्यासाठी काही निर्णय घेतले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
Comments are closed