दिल्ली, दि.३०( punetoday9news):-  मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशामध्ये यंदा खरीपाच्या पेरण्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ७% वाढ झाल्याचे सांगत  सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन केले.  ते म्हणाले की  स्टार्ट-अप मित्रांना, आपल्या नव उद्योजकांना सांगू इच्छितो की, ‘टीम अप फॉर टॉइज’-चला, सर्वजण मिळून खेळणी बनवूया! आता सर्वांसाठी ‘लोकल’-स्थानिक खेळण्यासाठी ‘व्होकल’ होण्याचा हा काळ आहे. 
‘इंडियन ब्रीड’च्या श्वानाबद्दल मोदी यांनी दिली माहिती-
गेल्या काही दिवासांपूर्वी बीड पोलिस आपला सहकारी रॉकी शॉनला सन्मानपूर्वक निरोप देतानाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. रॉकीने ३०० पेक्षा जास्त केसेस सोडवण्यासाठी पोलिसांची मदत केली होती.
कोरोना संसर्ग व गर्दी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी गणेशोत्सव ऑनलाइन साजरा केला जात आहे. देशातील अनेक नागरिकांनी इकोफ्रेंडली गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली आहे.  गांधीनगर येथील Children University आणि भारत सरकराच्या MinistryWCD, EduMinOfIndia, minmsme या सर्वांसोबत मिळून लहान मुलांसाठी काय करता येईल यावर विचार केला आहे.
” रविंद्रनाथ टागौर म्हणाले आहेत की बेस्ट टॉय तो असतो जो अपुर्ण आहे आणि लहान मुले खेळताना त्याला पुर्ण करतात. सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल. पोषण महिन्यात MyGov portal वर एक food and nutrition quiz, मीम्स competitionचे आयोजन करण्यात येणार आहे.
 एक ‘भारतीय कृषी कोष’ तयार करून यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोणतं धान्य पिकतं त्याची nutrition value किती आहे. याची सर्व माहिती दिली जाणार आहे.

Comments are closed

error: Content is protected !!