पिंपरी, दि. ३०( punetoday9news):- आम्ही मराठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘We Maratha Smart Kid 2020’ या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेड गाव येथे वास्तव्यास असणारी हिंदवी सुधीर राऊत ही विजेती ठरली आहे. हिंदवीला We Maratha Smart Kid 2020 सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
आम्ही मराठा हा मराठ्यांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रुपच्या वतीने ‘We Maratha Smart Kid 2020’ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मराठा बांधवांनी आपल्या मुलांचा समावेश करत मोठा प्रतिसाद नोंदविला. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील 103 मुला-मुलींनी सहभाग घेतला. 10-10 जणांची फेरी करून अंतिम दहा जणांची निवड करण्यात आली. त्यातून हिंदवीचा प्रथम क्रमांक आला आहे.
दरम्यान, अंतिम फेरीतील इतर सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र कुरियरद्वारे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती We Maratha Founder अनिरुद्ध शिवाजी शेलार, सोशल मीडिया प्रमुख सुधीर सोनवणे, महाराष्ट्र राज्य प्रमुख मयूर पाचोरे, सरचिटणीस विशाल बोरसे, राज्य समन्वयक अमित धावडे, महिला विंग प्रमुख स्नेहल कदम पाटील, सोशल मीडिया समन्वयक माऊली इंगळे यांनी दिली.
Comments are closed