दिल्ली, दि ३१ (punetoday9news):- काही दिवसांपूर्वी रैनाने घरगुती कारणामुळे आयपीएलचा १३वा हंगामातून माघार घेतल्याचे वृत्त वाचून सर्व त्याच्या क्रिकेट चाहत्यांना व चेन्नईच्या संघासाठी धक्का बसला होता. मात्र प्रत्यक्षात रैनाने आवडीनुसार हाॅटेल मधील रुम न मिळाल्याने आयपीएल सोडण्याची माहिती समोर आली आहे.
श्रीनिवासन यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले कि, रैनाच्या डोक्यात यश गेले आहे. रैनाच्या आयपीएल सोडण्यावर अनेक चर्चा सुरू होत्या. त्यापैकी एक म्हणजे संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाल्याने तो घाबरला होता आणि त्यामुळेच त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला. तर दुसरे कारण म्हणजे रैनाला हॉटेलमधील रुम खराब मिळाली होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष असेलल्या एन श्रीनिवासन यांनी वरील दोन्ही गोष्टींना दुजोरा दिला आहे. हॉटेल रूमवरून रैना आणि संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्यात वाद झाला होता. धोनीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण रैनाने त्याचे ऐकले नाही आणि आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला.
त्याला करोना संदर्भातील नियम कठोर हवे होते. रैनाला धोनी प्रमाणे रुम हवी होती. रैनाला मिळालेल्या रुम मध्ये बाल्कनी मनासारखी नव्हती. त्यातच संघातील जलद गोलदाज दीपक चाहर आणि विकेटकिपर ऋतुराज गायकवाड सह अन्य १३ जणांना कोरना झाला. त्यामुळे घाबरून त्याने परतण्याचा निर्णय घेतला .
Comments are closed