दिल्ली, दि. ३१ (punetoday9news):- सर्वत्र पेपरलेस व्यवहारांना सरकार प्राधान्य देत असताना काही बँकांनी ऑनलाईन व्यवहारावर चार्जेस लावण्यास सुरूवात केली होती त्याची दखल घेत इलेक्ट्रॉनिक ट्रान्जेक्शन वर चार्जेस न लावण्याचे निर्देश केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना दिले आहेत.
“काही बँका UPI ट्रांजेक्शनवर चार्जेस लावत असल्याचे समोर आलं आहे. एका विशिष्ट ट्रांजेक्शनच्या मर्यादेनंतर मर्चंट डिस्काउंट रेट्स (एमडीआर) घेतले जात आहेत. मात्र, हे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेसच्या (सीबीडीटी) निर्णयाविरोधात आहे”, असे स्पष्ट करण्यात आले आहे
ट्विटरवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. “ज्या बँकांनी १ जानेवारी २०२० नंतर ग्राहकांकडून डिजीटल ट्रांजेक्सनवर चार्जेस लावले असतील त्यांनी ते पैसे ग्राहकांना परत करावे. त्याचबरोबर यापुढे कोणत्याही बँकेने अशा प्रकारचे चार्जेस लावू नयेत”, असं सीबीडीटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Advertise:-
Comments are closed