पंढरपूर, दि. ३१( punetoday9news):- लाॅकडाऊन मुळे कित्येक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच विश्व वारकरी सेवा कडून आज हजारोंच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले नियमांचे पालन आम्ही आता करणार नाही अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी स्वीकारली होती. त्यावेळी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंबेडकर यांनी पंढरपुरातील आंदोलन मागे घेतले आहे व १५ जणांसोबत जाऊन त्यांनी विठ्ठलाचे दर्शनही घेतले.

यावेळी  प्रकाश आंबेडकर म्हणाले कि,राज्य सरकारने मंदिर, मशीद, बुध्दविहार सुरु केले जातील असे आश्वासन दिले असून त्यासाठीची नियमावली तयार करण्यासाठी सरकारला ८ दिवस लागतील.

मात्र सरकार कडून  धार्मिक स्थळे उघडण्याचा आदेश आला नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊ. लोकभावनेचा आदर केल्याबद्दल सरकारचा आभारी असून वंचितच्या आंदोलनाला यश आले आहे तसेच ८५ % लोक बरे झाले आहेत तर मग घाबरायचं कशाला ? असा प्रश्न माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!