दिल्ली,दि. ३१ ( punetoday9news):- भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे  आज वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे.  दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या पाच दशकांमध्ये प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, सभागृह नेते आणि भारताचे राष्ट्रपती यांसह विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडताना त्या त्या पदांची उंची वाढविली. जवळजवळ चार दशके सातत्याने संसदेचे सदस्य असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी देशातील संसदीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी असाधारण असे योगदान दिले आहे .

पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावले. त्यांचा मृत्यू एका युगाचा अंत आहे. प्रणव मुखर्जी यांचे कुटुंबीय, मित्र आणि सर्व देशवासियांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम होता. ५ दशकांच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात, अनेक उच्च पदांवर असूनही ते नेहमीच जमिनीशी जोडले गेले.

तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही दुखः व्यक्त केले आहे. ते म्हणाले देशाच्या विकासाच्या मार्गावर त्यांनी छाप सोडली आहे. एक विद्वान, एक राजकारणी त्यांचे समाजातील सर्व घटकांनी कौतुक केले.

 

Comments are closed

error: Content is protected !!