दिल्ली, दि. १( punetoday9news):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था 23.9 टक्क्यांनी घसरली असून हि आत्तापर्यंत झालेली सर्वात मोठी घसरण आहे.

याचा जवळपास सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसणार आहे

कृषिक्षेत्राचा विचार करता देशाच्या कृषिक्षेत्राने या तिमाहीत 3.4 टक्के एवढी वाढ दिली आहे. मागील वर्षी ही वाढ 3 टक्के एवढी होती.

बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक फटका बसला आहे. हे क्षेत्र यंदा मात्र 50.3 टक्क्यांनी घसरले आहे.

उत्पादन क्षेत्रातही 39.3 टक्क्यांनी घट झाली आहे.

आर्थिक क्षेत्र तसेच स्थावर मालमत्ता यामध्ये 5.3 टक्के तर सामान्य प्रशासन, संरक्षण आणि अन्य सेवांच्या क्षेत्रात 10.3 टक्के अशी घट झाली आहे.

त्याचबरोबर  खाण क्षेत्र (23.3 टक्के), ऊर्जा क्षेत्र (7 टक्के), व्यापार, हॉटेल, परिवहन, दळण वळण आणि सेवा क्षेत्रामध्ये 47 टक्क्यांनी घट झाली आहे.

या घसरलेल्या विकासदराचा असा परिणाम होण्याची शक्यता आहे.

केंद्र आणि राज्य सरकारचे करसंकलनच कमी होईल.
जीएसटी संकलन कमी होईल.
केंद्र-राज्य सरकारचे उत्पन्न कमी झाल्याने मंदीसदृश स्थिती येण्याचा धोका दिसतो आहे.
बेरोजगारी आणखी वाढणे, वेतन कपात असे फटके सर्व क्षेत्रात बसू लागतील.
सरकारी करांमध्ये वाढ होऊ शकते. सरकारकडे पैसेच नसल्याने नोटा छापून घेण्याचे प्रमाण वाढवावे लागेल.
चलन विस्तार झाला की भाववाढ होते, हा अर्थशास्त्रातला नियम आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची चिन्हे आहेत.
सद्यस्थितीत बँकिंग क्षेत्रात ठेवींवर व्याजदर जास्त मिळणार नाही. कर्जे देताना बँकांना कमालीची सावधगिरी बाळगावी लागेल.
वरील सर्व परिस्थितीचा विचार करता चीनशी युद्ध स्थिती निर्माण झाली तर कोणत्याही क्षणी शेअर बाजारात  मोठी घसरण पाहायला मिळू शकते.अर्थविश्लेषकांनी वर्तविलेल्या पूर्वअंदाजांपेक्षा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेची अधोगती मोठी असल्याचे ही आकडेवारी दर्शविते. ही देशासाठी चिंतेची बाब मानली जाते.

 

Comments are closed

error: Content is protected !!