मुंबई , दि.२ (punetoday9news):- रिलायन्स जिओने सोमवारी जिओ फायबरसाठी 399 ते 1499 रुपयांदरम्यान 4 नवीन प्लॅन्स आणले आहेत. यासोबतच कंपनीने 30 दिवस फ्री ट्रायल सेवा देण्याचीही घोषणा केली आहे.
जिओ फायबरचे 4 जबरदस्त प्लॅन
399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 एमबीपीएस इंटरनेट स्पीड मिळेल, 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएस इंटरनेट स्पीड, 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150 एमबीपीएस इंटरनेट स्पीड, 11 टॉप अॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळेल.
1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबीपीएस इंटरनेट स्पीड मिळेल. याशिवाय 1499 रुपयांचा प्लॅन घेणाऱ्या युजर्सना 12 टॉप ओटीटी अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. मात्र, 399 रुपये आणि 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये ही सुविधा मिळणार नाही. सर्व प्लॅन्समध्ये फ्री व्हॉइस कॉलिंग सेवाही आहे.यासोबतच कंपनीने सर्व नवीन ग्राहकांसाठी 30 दिवस फ्री ट्रायल देण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत सर्व नवीन ग्राहकांना 150 एमबीपीएस डेटा स्पीड, 4K सेट टॉप बॉक्ससोबत 10 ओटीटी अॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळेल. यामध्ये मोफत व्हॉइस कॉलिंगची सुविधेचाही ग्राहकांना लाभ घेता येईल.
जिओ फायबर बुक करण्यासाठी जिओच्या अधिकृत वेबसाईटला भेट देवून Jio.com/fiber अधिक माहिती घ्या.
Comments are closed