मुंबई, दि. २(punetoday9news):- कोरोनाच्या काळात ऑनलाईन आर्थिक फसवणूकीचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे बँक , सायबर शाखा व ग्राहक यांची चांगलीच धावपळ होते तसेच गुन्हेगारास शोधण्यात बऱ्याचदा अपयश येते   त्यामुळे देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी सुरक्षित बँकिंगाठी नवी एटीएम सेवा सुरु केली आहे

ग्राहक जेव्हा एटीएममधून बॅलन्स किंवा मिनी स्टेटमेंट चेक करण्याची मागणी करेल तेव्हा त्या ग्राहकाला एसएमएसच्या माध्यमातून अलर्ट करण्यात येईल. त्यामुळे

हा व्यवहार संबंधित ग्राहकाद्वारेच होत आहेत की नाही, याची खात्री करता येईल तसेच ग्राहक स्वतः आपल्या डेबिट कार्डद्वारे व्यवहार करत आहे की नाही हे सुद्धा समजू शकेल.

जर बँकेच्या ग्राहका ऐवजी व्यवहार इतर कोणी त्रयस्थ व्यक्ती करत असेल तर एसएमएसद्वारे ग्राहकाला सूचना मिळाल्याने तो तात्काळ आपलं डेबिट कार्ड ब्लॉक करु शकेल व आर्थिक फसवणूक होण्यापासून वाचू शकतो.

बँकिंगच्या अनावश्यक ॲप्सपासून सुटका करुन घेण्यासाठी ग्राहकांनी प्ले स्टोअरवरून YONOSBI हे एकच ॲप डाऊनलोड करावे असेही म्हटले आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!