मुंबई,दि.३(punetoday9news):-  कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लक्षणं नसताना लोक रुग्णालयात दाखल होत असतात. यामध्ये श्रीमंत लोक ICU बेडचा अधिक वापर करत आहेत, असे दिसून येत असल्यामुळे याबाबत जागरूक राहीलं पाहिजे. ICU बेड लक्षणं नसलेल्यांना देण्याची गरज नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे. 80 टक्के लोकांना लक्षण नाहीत. त्यांच्यावर परिस्थितीनुसार उपचार करत आहोत.
बरेच जण लक्षणं नसताना बेड अडवून ठेवत आहेत. लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवणाऱ्यांना थांबवावं लागेल, असंही ते म्हणाले.टेस्टिंग आणि ट्रेसिंग वर भर दिला आहे. मोठ्या प्रमाणात ट्रेसिंग करत आहोत. कमी टेस्टिंग करतात त्यांना टेस्ट करण्याबाबत सांगत आहोत.

रुग्ण उशिरा हॉस्पिटलमध्ये येतो. हे चुकीचं आणि प्राणघातक आहे.  थोडी लक्षणं दिसली तर त्वरित उपचार केले पाहिजे, असंही टोपे यांनी सांगितले.

 

Comments are closed

error: Content is protected !!